
नवीन नांदेड। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह दिंडोरी प्रणित उत्सव निमित्ताने आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्ताने १२ ते १८ एप्रिल आयोजित सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


दरवर्षी प्रमाणे आयोजित दिंडोरी प्रणित सिडको येथील स्वामी समर्थ केद्र रामनगर येथे १२ ते १८ एप्रिल दरम्यान सप्ताह आयोजित करण्यात आला होता यात दैनंदिन सकाळी नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदिक्षणा, भूपाळी आरती, सामुहिक गुरु चरित्र, नवैध आरती, विशेष याग, तर सायंकाळी धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.


तर सप्ताह मध्ये मध्येही विविध नित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, १८ एप्रिल रोजी सकाळी नित्य स्वाहाकार, बलीपुरणाहुती, सत्य दत्त पुजन, महानैवेद्य आरती व अखंड यज्ञ नाम जप यज्ञ सप्ताह सांगता आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याला स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र रामनगर सिडको यांनी केले आहे.

