
नवीन नांदेड। शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी जि.नांदेड येथील १९ वर्षा खालील क्रिकेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग सहाव्यांदा पात्र ठरला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


माध्यमिक विद्यालय काकांडी जि.नांदेड येथील १९ वर्षा खालील क्रिकेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेचा संघ मुंबई शहर येथे दिनांक १९एप्रिल ते २२.एप्रिल पर्यंत होणा-या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे. शिवशक्ती शाळेच्या संघाने या पुर्वी सन २०१६ व सन २०१८ या वर्षात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धत दोन वेळेस उपविजेते पद मिळविलेले आहे.


या निवडी बद्दल संस्थेचे सचिव एल. के. जाधव , मुख्याध्यापक विपीन जाधव व शाळेच्या सर्व कर्मचारीसंघ व्यवस्थापक पी.जी.पवार व काकांडी परिसरातील सर्व पालकांनी संघाचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

