
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ, रुतवा प्रकाशन आणि कांचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा २०२३ चा वाड्मय पुरस्कार नायगाव बाजार येथील भुमी पुत्र डॉ.संजय भालेराव यांच्या “महाराष्ट्रातील पेयजल व्यवस्थापन” या ग्रंथास जाहीर झाला आहे.


डॉ.भालेराव किशनराव भालेराव यांचा पेयजल व्यवस्थापन हा पाणी व्यवस्थापना संदर्भातील मौलिक ग्रंथ आहे. सदर ग्रंथाची उपयुक्तता विचारात घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.


याबद्दल मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण. हणमंतराव पाटील चव्हाण.केशवराव पाटील चव्हाण.नगराध्यक्षा मीनाताई सुरेश पाटील कल्याण.उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण.खरेदी विक्री संघाचे चेअरमन मा.श्रिनिवास पाटील चव्हाण.युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण.नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ व मित्र परिवार यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०७ मे २०२३ रोजी होणाऱ्या परिवर्तनवादी युवा साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे. त्याबद्दल ग्रंथाचे लेखक आणि प्रकाशक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा .

