
इस्लापुर/किनवट/ नांदेड। जिल्ह्यातील इस्लापुर सर्कलमध्ये येणाऱ्या मौजे भिशी येथील 43 वर्षे तरुणाने इस्लापूर पोलीस स्टेशन समोर चक्क अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याने इस्लापूर शहरात चागलीच खळबळ उडाली आहे.


किनवट तालुक्यातील इस्लापुर नजीक असलेल्या मौजे भिशी येथील विकास माधव कायपलवाड हा तरुण भिशी तलावातून मत्स्य व्यवसाय करून आपली उपजीविका भागवित असे. पण अचानक या तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेऊन पोलीस ठाण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये हा तरुण जवळपास 60 टक्के जळाला या तरुणास वाचण्यासाठी गावकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.


सदरील तरुणाने त्यांच्या आई-वडिलास व त्यास लिंबाजी पोशटी कायपलवाड व देवानंद पोशटी यांचेकडून भिशी तलावातून मासे काढण्यास अडचण निर्माण होत असले प्रकरणी व जिवे मारण्याची धमकी मिळत असले प्रकरणी इस्लापूर पोलिसात दिनांक 19 /7/ 2023 व दिनांक 3/3/ 2023 रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे अनुषंगाने इस्लापूर पोलिसांनी सदरील गैर अर्जदार मंडळीवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केली.


तरीपण सदरील मंडळीचा त्रास न थांबल्याने विकास माधव कायपलवाड यांनी नांदेड पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक 6/ 4/ 2023 रोजी लेखी निवेदन देऊन तक्रार सादर केली. वरील लोकांकडून होणारा त्रास कमी करावा. अशा स्वरूपाची मागणी केली पण अचानक विकासने टोकाचे पाउल उचलल्याने या घटनेत जळीत विकास हा 60 टक्के भाजला असून, त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणाकडे इस्लापूर पोलीस स्टेशनचे सा.पो.नि. रवि वाहूळे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
