नांदेड| जिल्ह्यातील खरीप हंगामच्या पिकविम्या च्या बाबतीत शेतकरी पुञ संर्घष समीतीचे बालाजी पाटील ढोसणे व बालाजी पाटील सांगवीकर यांनी आक्रमक भुमिका घेत खरीप हंगामचा पिकविमा वाटपात शेतकर्यांची थट्टा केल्याप्रकरणी जिल्हाअधिक्षक कृषि अधिकार्यांना घेराव घालत वंचीत शेतकर्यांना पिकविमा वाटप करण्याची मागणी शेकडो शेतकर्यांना घेवुन यावेळी केली.
नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामचा पिकविमा पडत होता त्यात शेतकर्यांना 200,300 रुपये पडत होते याचाच जाब विचारण्यासाठी शेकडो शेतकर्यांना घेवुन शेतकरी पुञ संर्घष समितीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय गाठले आणी शेतकर्यांची थट्टा करणार्या पिकविमा कंपनी बाबतीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार्यांना घेराव घातला यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत शेतकर्यांनी कार्यालय दणाणुन सोडले यावेळी विमा कंपनीचे प्रतिनीधीना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात बोलावुन घेत बर्याच तालुक्याचे पैसे वाटप शिल्लक असुन आणखी पैसे वाटप होतील आणी कमी पडत असलेले पैसे 25 टक्के आगाऊ रक्ममेच्या वाटपातील 15 टक्के शिल्लक असल्याचे सांगुन लवकरच उर्वरीत पैसे वाटप होतील.
असे आश्वासन शेतकरी पुञ संर्घष समितीच्या पदाधिकार्यांना दिल्यावर घेराव माघार घेत शेतकरी पुञ संर्घष समितीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी श्री बोरा यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी पाटील ढोसणे,बालाजी सांगवीकर,सुभाष पाटील एकलारे,संतोष बिल्लाळीकर,रुषिकेश सुगावे,केशव शिंदे,सोपान शिंदे,संजय गायकवाड,शांताबाई शिंंदे,जनाबाई गवाले,गोविंद आचमारे,शंकर इसनकोले,उत्तम वडजे,राम वडजे,मारोती वाघमारे,डावकोरे पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थितीत होते