
उस्माननगर, माणिक भिसे| महामानव,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त संकल्प व आरोग्यदायी सेवाभावी संस्था डॉक्टर लेन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फिल्टर पाणी वाटप हे डॉक्टर बाबासाहेब याच्या पुतळ्यास आभिवादन करण्यास आलेल्या तमाम अनुयायी यांना पाणीवाटप करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनी संस्थेमार्फत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .


यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे डॉ.दिलीप फुगारे ( एम.एस. सर्जन ,आपेक्षा हाॅस्पीटल नांदेड )यांच्या हास्ते डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पूजन करुन पुष्पहार अर्पण केले .त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भिम आनुयायीस डॉक्टर दिलीप फुगारे यांच्या हस्ते पाणीवाटप करून भीमसैनिकांना शुभेच्छा देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मांगीलाल राठोड, संस्थेचे सचिव मनोज चव्हाण, उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे सम्यक कांबळे,संस्थेचे कर्मचारी वैशाली कांबळे ,प्रियंका एडके, ममता डांगरे ,नागनाथ कुरूंदे,राजू सोनकांबळे दीपक जाधव, आयुब पठाण ,शंकर चव्हाण ,सत्यनारायण पवळे ,आरिफ सैकलगर , प्रिया पळसपगार ,श्रीकांत राठोड ,प्रदीप जोंधळे, सुजाता माखणे या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


यावेळी डॉक्टर दिलीप फुगारे ( एम.एस सर्जन ) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.व संकल्प व आरोग्यदायी सेवाभावी संस्थेचे कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांच्या कार्याचे कोतूक केले.तुमच्या हातून अशीच समाज सेवा घडावी व माझ्या दवाखान्यात तुमच्या संस्थेमार्फत येणाऱ्या रूग्णांना कमीत कमी फीसमध्ये उपचार करून लाभ मिळवून देण्यात प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल .असे डॉक्टर यांनी सांगीतले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष मांगीलाल राठोड यांनी बोलतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याची ओळख मनोगतातून व्यक्त केले.व संस्थे विषयी माहिती सांगीतली यामध्ये सर्व महापुरुषांची अनेक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात येते ,संस्थेमार्फत अनेक आरोग्य शिबीरे घेतले जातात. यामध्ये डोळ्यांची तपासनी ,दातांची तपासणी,पोटाची तपासणी व गरजू रूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करणे,ईसीजी,सोनोग्राफी, एक्सरे, अने प्रकारचे ऑपरेशन व अनेक रोगावर कमीत कमी दरात संस्थेमार्फत उपचार करण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले.


नांदेड उत्तरचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आमदार बालाजी कल्यानकर यांनी पाणी वाटपाच्या ठिकाणी येवून भेट दिली .त्यांनी पाणीवाटप उपक्रमाची प्रशंसा करून इतर संस्थेने आदर्श घ्यावा असे आवाहन केले. हा सुसूत्य उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. व महाराष्ट्रातील भीम अनुयायांनी या संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
