
देगलूर/नांदेड| भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त देशात उत्साहात भिमजयंती साजरी करण्यात येत आहे.14 एप्रिल पासून पुढील 15 दिवस भीमजयंती निमित्त सांस्कृतिक,सामाजिक उपक्रम,बौद्धिक उपक्रम घेण्यात येतात. या अनुषंगाने देगलुर येथील युवक गायक, संगीतकार,गीतकार, पंचशील सोनकांबळे यांची गाणी संबंध महाराष्ट्रात वाजली व गाजली.


पंचशील सोनकांबळे यांनी लिहलेली व संगीतबद्ध केलेली गीते यावर्षी खुप गाजली. सोशल मीडिया आणि युटूब वर पंचशील सोनकांबळे यांनी पहिले भीम गीत जगात दरारा आमचा निराळा हाय,रक्त भीमाच आमच्यात हाय हे आणि निघाली स्वारी ही आमच्या या राजाची बघती सारी दंगुणी भीमाची जयंती या दोन्ही गीतास यु-ट्यूब वरील श्रोत्यांनी व सोशल मीडियावर भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हे दोन्ही गीत सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाले. या वर्षीच्या जयंती मिरवणुकीमध्ये मध्ये सबंध महाराष्ट्रात हे दोन्ही गाणी खुप वाजली व अजूनही वाजत आहेत.


महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणारे हे महाराष्ट्रातील शेवटचे शहर आहे. देगलूर येथील संगीत शिक्षक पंचशील सोनकांबळे हे शासनाच्या वतीने आयोजित मतदान जन-जागृती अभियान अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन स्वीप कक्षा मध्ये स्वरचित व स्वतः संगीतबद्द केलेल्या गीतांमुळे मतदान जनजागृती यशस्वी ठरली.त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार अरविंद बोलंगे, स्वीप कक्ष प्रमुख हमीद दौलताबादी,स्वीप कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद स्वामी,नरहरी कोलगाने, आदींनी त्यांची प्रशंसा केली होती.


पंचशील सोनकांबळे यांनी स्वलिखित संगीतबद्ध केलेल्या गीतरचना खेडोपाडी, वस्ती तांड्यावर जाऊन गाऊन मतदान जनजागृती केली. त्याचबरोबर अमृत महोत्सव उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील विविध गावोगावी जाऊन कायदेविषयक जागृती आपल्या स्वलिखित व संगीतबद्ध गीतातून गायन करुन खेडोपाडी जनजागृती केली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रात उत्कृष्ट दिग्दर्शन/लेखन पुरस्कार बालकल्याणच्या वतीने पंचशील सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला. तर म.ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनाच्या वतिने राज्यस्तरीय कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचशील सोनकांबळे हे सध्या मुंबई विद्यापीठ संगीत क्षेत्रात पी.एच.डी पेट उत्तीर्ण असुन एम.ए.बि.एड.संगीत विशारद आहेत. विविध गीत,भिमगीत प्रबोधनात्म कार्यक्रमातून समाज प्रबोधन करीत आहेत. अशा या हरहुन्नरी कला शिक्षकाची वाटचाल नक्कीच इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल .
