
नांदेड| वासवी, वनिता क्लब सिडकोे व श्री बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर सोसायटी हडको यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वासवी माता जन्मोत्सवच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच 24 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान श्री बालाजी मंदिर हडको येथे श्री वासवी माता महापूराण आयोजीत करण्यात आले आहे. या निमित्त श्री वासवी महाकुंभ, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


वासवी उपासक व प्रख्यात कथाकार श्री आशिषानंद महाराज धारुरकर हे श्री वासवी माता महापुराण सांगणार आहेत. श्री वासवी मातेचे संगीतमय सात दिवसीय जिवनचरित्र व वासवी मातेच्या जिवन चरित्रावरील विविध प्रसंगाचे देखाव्याद्वावरे सादरीकरण होणार आहे. आर्यवैश्य समाजाची कुलस्वामीनी माता कन्यका परमेश्वरी यांच्या जिवन चरित्रावर हे श्री वासवी माता महापुराण महाराष्ट्रात प्रथमच आयोजीत करण्यात आले आहे.


श्री वासवी महाकुंभ यत्रात 102 यजमान असलेल्या महायज्ञ आर्यवैश्य समाजाचे कुलगुरू भास्कराचार्य महाराज यांच्या कृपा आर्शीवादाने 16 भ्रमवृंदांच्या वासवी मातेच्या मंत्रोच्चाराने होमहवन, दररोज 21 यजमान याप्रमाणे 5 दिवस 102 यजमान वासवी महायंज्ञास सहभागी होणार आहे. कथेच्या पहिल्या दिवशी 102 कलशधारी महिलांसह ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 1021 महिलांतर्फे सामुहिक कुंकुमार्चन होणार आहे. दररोज सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत श्री वासवी माता महापुराण होणार आहे. 30 एप्रिल रोजी श्री वासवी मातेचा जन्मोत्सव असल्याने त्याचा दिवशी या सोहळ्याचा महाप्रसादाने समारोप होईल.

