
नांदेड| येथील सांस्कृतिक चळवळीत अग्रसेर असणाऱ्या सप्तरंग सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचे निवडणूक राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांचा राज्यभर व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी अनेक उपक्रम राबवत असतात यासाठी नमूदित मतदारांना प्रेरित करणे मतदान हक्क बजावण्यासाठी समाजाला प्रेरित करणे व समाजातील विविध पैलूंना देखील मतदान करता येतं लोकशाहीतील सर्वात मोठे हक्क म्हणजे मतदान हे या स्वीप च्या माध्यमातून भारत निवडणूक आयोग करत असतो.


मतदान प्रचार व प्रसिद्धीसाठी तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून मतदानाचा हक्क पूर्णपणे आणि एकही तृतीयपंथीय यातून वंचित राहू नये म्हणून विविध उपक्रम आणि कार्यक्रम भारत निवडणूक आयोग घेत असतो याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय तृतीयपंथीय आयकॉन म्हणून नांदेडच्या सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सानवी जेठवाणी यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून आयोगाच्या राज्यातील स्वीप कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय आयकॉन म्हणून राज्यातील नागरिकांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्यासाठी जेठवाणी यांचे सहकार्य मिळेल या हेतूने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


डॉ सानवी जेठवाणी यांनी उपमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याचे शरद दळवी यांचे आभार मानले आहे व त्यासोबत भारत निवडणूक आयोगाचे देखील फार आभार मानले आहे की त्यांनी माझी निवड करून मला आणखीन एक समाजासाठी नवीन विषयावर काम करण्याची संधी दिली आहे ही संधीचा पुरेपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त मतदान कडे तृतीयपंथी व समाजातील सर्व लोकांनी पुढे यावं यासाठी मी काम करेन नुकतीच माझ्या आईचं निधन झालं हे नियुक्ती त्यांचा आशीर्वाद म्हणून आणखीन प्रेरणेने काम करेल व समाजात लोकशाही आणखीन घट्ट करण्यासाठी माझा प्रयत्न राहील अशी ग्वाही पत्रकारांना बोलताना जेठवणी यांनी दिली.

