
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। हर घर जल योजना म्हणजे पंत प्रधान मोदीजी नी जनतेच्या दूरदृष्टीचा विचार करून केलेली योजना असून बेंद्री गावासाठी १ कोटी ५ लाख खर्च करून ही योजना उभारण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या घरात पाणी येणार आहे या मुळे जनतेच्या सुविधा साठी ही योजना असून.त्याचा पुरेपूर फायदा जनतेने घ्यावा असे आव्हान खा चिखलीकर यांनी या वेळी उदघाटक म्हणून बोलताना व्यक्त केले


बेंद्री ता. नायगाव येथे खा.चिखलीकर यांच्या हस्ते एक कोटी पाच लाख खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘हर घर जल’ योजनेचा व सी सी रोडचा शुभारंभ करण्यात आला.व खा चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार मोटार सायकल रैली व फटाक्यांची आतिषबाजी करीत सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर व बेंद्री ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी व्यंकटराव पा.गोजेगावकर,तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून आ.राम पाटील रातोळीकर, उपस्थित होते.


दाजी भावजी च्या राजकारणात नांदेड चा विकास खुंटला


खा चिखलीकर म्हणाले की,दाजी व भावजीनी ५० वर्ष सत्ता भोगली पण एक किलो मीटरचा हायवे नांदेड जिल्ह्यात केला नाही किंवा नांदेड जिल्ह्याचा विकास केला नाही . त्यांना नांदेड बिदर रेल्वेमार्ग चा प्रश्न निकाली काढता आला नाही पण मी खासदार होताच हा प्रश्न मार्गी लावला. मी खोटे बोलुन मत घेत नाही मी निवडणूकीत जी आश्वासन देतो ते करून दाखवतो म्हणूनच सर्व पक्ष फिरलो असलो तरी पण यशस्वी ठरलो या मागचे फलित आहे असे म्हणाले.

अशोकराव यांना वडिलांचे आर्शिवाद होते म्हणून ते सत्तेवर राहीले पण ते जनतेच्या विकासाचे काहीच करू शकले नाहीत असा टोला त्यांनी लगावला. याचे उदाहरण म्हणजे मागील स- रकार मध्ये आशोकराव चव्हाण मंत्री भाषणातून सागितले होते. पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते नदिड बिदर रेल्वेमार्गा साठी सरकारचे नाहरकत प्रमाण पत्र पाहीजे होते पण अशोकराव चव्हाण यांच्या काळात ते मिळू शकले नाही त्यांचे सरकार पडलेआणि पुन्हा संधी हुकली ते मी वरिष्टाच्या सहकार्याने शिंदे फडणवीस सरकारच्या काळात करू शकलो असे खा चिखलीकर यांनी या वेळी सांगितले.

निवांत झोप लागावी म्हणून अशोकरावचा भाजप प्रवेश

अशोकरावच्या भाजप प्रवेशावर टीका करताना खा. चिखलीकर म्हणाले अशोकराव शांत झोप घेण्या साठी ते भाजप मध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत . ज्या भाजपाला ज्यानी पाण्यात बघितले त्यानी स्वार्थ साधण्यासाठी हा उपद्व्याप करने म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे होय आसा टोला त्यानी लगावला.
यावेळी आपल्या भाषणातून दत्तमंदिर सभागृहासाठी आ.राम पाटील रातोळीकर यांनी निधी जाहीर केला.व्यंकटराव पा गोजेगावकर व श्रावण पा भिलवंडे,प्रवीण पाटील चिखलीकर यांचीच भाषणे झाली.ग्रामपंचायत बेंद्री येथे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचा भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम व नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम बेंद्री नगरीचे सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर व ग्रामस्थ यांनी शनिवार दि.१५एप्रिल रोजी व्यवस्थित नियोजन लावून घडवून आणला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेश देशमुख कुंटूरकर, , प्रविण पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, माणिक लोहगावे देविदासराव बोंमनाळे, दिलीपराव धर्माधिकारी, भगवानराव लंगडापुरे, उमाकांत राव देशपांडे, विनायकराव पाटील शिंदे, विठल कत्ते,राहुल पाटील नकाते , गजानन पाटील चव्हाण, व्यंकटराव पाटील चव्हाण, धनराज शिरोळे, भाऊ पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, शिवा गडगेकर, डॉ .जिवन चव्हाण, चंदू पाटील चव्हाण, , राजू अप्पा बेळगे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
बेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर ,उपसरपंच भोस्कर, ग्रामसेवक टी जी रातोळीकर व सदस्य यांनी फटाक्याच्या अतिषबाजीत व भव्य खोबळ्या चा हार घालून खा चिखलीकर यांचे स्वागत केले. सर्व प्रमुख अतिथीचा सेवा सहकारी सोसायटी चेरमन,सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य,व ग्रामस्थ यांनी गुलाबाचे हार घालून भव्य स्वागत केले.प्रास्ताविक सरपंच बेंद्रीकर यांनी केले तर आभार ग्रामसेवक टी जी रातोळीकर यांनी मानले संचलन बापुलें सर व सोनमनकर सर यांनी केले.कार्यक्रमास परिसरातील सरपंच उपसरपंच,चेअरमन,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.