
कंधार, सचिन मोरे। कंधार पासून जवळच असलेल्या पांगरा येथे वीज कोसळून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैव मृत्यू झाल्याची ह्रदय द्रावक घटना दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ९:१० मिनिटे सुमारास घडली. या घटनेमुळे पांगरा गावावर शोककळा पसरली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की १९ एप्रिल रोजी कंधार तालुक्यामध्ये रात्री वादळी वारे,विजेचा कडकडाट सह काही भागात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली.या सुमारास पांगरा येथील तरुण शेतकरी शंकर धोंडीबा घोरबांड वय ३२ वर्ष हे शेतकरी आपल्या शेतामध्ये हळद शिजवण्याचे काम करीत होते. त्यावेळेस अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटासह मोठ्या आवाज करीत वादळी वाऱ्यासहित वीज कोसळून शंकर घोरबांड यांचा जागीच मृत्यू झाला.


या प्रकरणाची माहिती पोलीस पाटील शिवाजी कोटेवाड यांनी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कंधार ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी कंधार यांनी शवविच्छेदन करून २० एप्रिल रोजी मृतदेह घोरबांड यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात. दिला शंकर घोरबांड यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ असा परिवार आहे.


वीज कोसळून बैल व म्हैस ठार- दि.१९ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वारा व विजेच्या कडकडाटाने तालुक्यात काही भागात वादळी वारे व पाऊसाच्या काही प्रमाणात सरी कोसळल्या यातच तालुक्यातील मोहिजा परांडा येथील तरुण शेतकरी प्रकाश रामेश्वर कदम यांची अंदाजे किंमत ७० ते ८० हजार रुपयांची म्हैस वीज कोसळून ठार झाली. तर तालुक्यातील कौठावाडी येथील शेतकरी मोहन माणिक पवळे यांचा अंदाजीत ६० ते ७० हजार रुपयांचा बैल वीज कोसळल्याची घटना कौठा वाडी येथे रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली. या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
