
हिमायतनगर| गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळ हिमायतनगर द्वारा संचालित राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलचा उदघाटन सोहळा दि २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास सर्व शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन संयोजक मंडळींनी केले आहे.


जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे कि, हिमायतनगर (वाढोणा ) जि. नांदेड उद्घाटन सोहळा निमित्ताने आग्रहपूर्वक सस्नेह निमंत्रण देतांना आम्हाला मनस्वी आनंद होतो की, यापुढील युग हे ज्ञानाच्या म्हणजेच शिक्षणाच्या कसोटीवर उतरणारे असेल. या युगात विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आम्ही समान ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या परिसरातील विद्यार्थी सर्वार्थाने विकसित व्हावा यासाठी, ‘राष्ट्र साधना पब्लिक स्कुल’ या संस्कार केंद्राचा आरंभ करण्याचा संकल्प सोडला आहे.


या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठीच हे निमंत्रण कृपया आपल्या विस्तृत कार्यबाहूल्यातून वेळ काढून उपस्थित रहावे. असेही यात म्हंटले आहे. हा उदघाटन सोहळा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. ना. गिरीषजी महाजन (मंत्री, ग्रामविकास तथा पालकमंत्री) उद्घाटक मा.श्री. विजयराव पुराणिक (राष्ट्रीय संघटन मंत्री, सेवा भारती) प्रमुख अतिथी मा.खा. प्रताप पाटील चिखलीकर (खासदार, नांदेड लोकसभा) मा. खा. श्री. हेमंत पाटील (खासदार, हिंगोली लोकसभा) मा.आ.श्री. माधवराव पाटील (हदगांव-हि. नगर विधानसभा)) मा.आ.श्री. राम पाटील रातोळीकर (वि.प.स.)


मा.श्री. प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.नांदेड मा. डॉ. सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.नांदेड मा.आ.श्री. भिमराव केराम (किनवट विधानसभा) मा. श्री. नागेश पाटील अष्टीकर (माजी आमदार) मा. श्री. बाबुराव कदम कोहळीकर (माजी जिल्हाप्रमुख शिवसेना) मा. श्री. संतोषजी तिरमनवार (जिल्हा संघचालक, रा.स्व.संघ) आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, उद्घाटन सत्रानंतर स्नेहभोज आयोजित केले आहे. सादर कार्यक्रम दिनांक : २६ एप्रिल २०२३ बुधवार वेळ : सकाळी ११.०० वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन विनीत कमलाकर दिक्कतवार प्रवीण जन्नावार श्याम रायेवार सुधीर उत्तरवार प्रमोद तुप्तेवार सर्व विश्वस्त गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळ, हि. नगर ( वाढोणा ) यांनी केलं आहे.
