
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। संत हे समाजांचे उध्दारक आहेत, संतांकडे समदृष्टी आहे, समाजातील अज्ञान अंधकार दुर करण्यासाठी आपल्या प्रपंचाचा विचार न करता इतरांच्या हितासाठी आपलं जीवन समर्पित केले, श्रीसंत गोरोबा काकांची तर निष्ठा भक्ती अचंबित करणारी आहे असे उदगार बाल कीर्तनकार दिव्या उर्फ वैशाली शेळके यांनी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सेवे दरम्यान काढले.


मांजरम येथे गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सेवेचे आयोजन केले होते.शंकरराव गोरडवार यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, या वर्षी बाल कीर्तनकार ह.भ.प दिव्या उर्फ वैशाली शेळके यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, या अभंगावर चिंतन करतांना संतांच्या उपकराचा सारांश घेताना संतांचे जिवनपट मांडला गोरोबा काका यांच्या निष्ठभक्ती अचंबित करणारी असल्याचे सांगून त्यांनी केलेल्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही, जगातील काही गोष्टींच्या उदाहरणार्थ नदी नाले झाड पशु पक्षी आई वडील गुरू साधुसंत यांच्या उपकारातून आपण कधी ही उतराई होऊ शकत नाही, असे अनेक दाखले देत कीर्तन सेवा केली.


यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली.यावेळी कीर्तनकार विकास भुरे, परमेश्वर महाराज केते बाल गायीका वैष्णवी काशीनाथ पानचावरे, अनंतराव मंगनाळे,मृदंगाचार्य शुभम माली पाटील यांच्या सह विठलेश्वर भजनी मंडळ, बसवेश्वर भजनी मंडळाचे टाळकरी गावकरी उपस्थित होते.
