हदगाव| दि 20 एप्रिल 2023 रोजी पळसा केंद्रांतर्गत मौजे गारगव्हान येथे पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून.तिन सहशिक्षक असुन, एक पद रिक्त आहे. मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी येथील मयत सहशिक्षक अनिल मोहन चव्हाण यांचे मूळ गाव असुन, त्यांचे वय 45 वर्ष होते ते जिल्हा परिषद शाळेत 2013 पासून सहशिक्षक म्हणून रुजू झाले होते. सध्या हदगांव येथे रुम करून राहत असल्याचे सांगितले. दि 19 एप्रिल 2023 रोज बुधवार सकाळच्या सत्रातील शाळा करून माझे काम बाकी असल्याचे सांगत वर्गाची चाबी ठेवून घेत सेवक व सहशिक्षकांना घरी जाण्याचे सांगितले असल्याचे संबंधित शिक्षकाने सांगितले.
दि 20 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजता सेवकांनी शाळा उघडल्याने त्यांना पहिल्या वर्गात गळफास घेतलेल्या अवस्थेत शिक्षक दिसल्यावर त्यांनी ही माहिती संरपंच व पोलीस पाटील यांना दिल्याने त्यांनी मनाठा पोलीस स्टेशन व त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे बिट जमादार कृष्णा यादव , वागतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.
मयत शिक्षकांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यांमध्ये शाळेतीलच सहशिक्षकीकडे तिन लाख चाळीस हजार रुपये असुनअनेक वेळा मागुनही देत नसल्याने देण्या घेण्याच्या विवंचनेत आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. मयताच्या पत्नीने मनाठा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असून जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला असून सहा वाजेपर्यंत प्रेत ताब्यात घेतले नव्हते.
मयत सहशिक्षक व सहशिक्षीका यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातुन अनेक वेळा तक्रारी झाल्या असल्याची चर्चा असुन यांच्या हा वाद मयताच्या घरापर्यंतही गेला होता असे मयताच्या नातेवाईकांकडून कळत आहे. मनाठा पोलिस पुढील तपास करीत असून बातमी संकलन करेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून प्रक्रिया सुरू असल्याचे समजले