
उस्माननगर। येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केंद्रस्थानी पुर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यास केद्रातंर्गत शाळेतील सहशिक्षक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित दर्शवुन उत्साहात संपन्न करण्यात आला.


सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जयवंतराव काळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीती लाठ खु शाळेचे मु अ श्री गादेकर , कन्या शाळेच्या मु अ सौ. विद्या वांगे मॅडम उपस्थित होते . केंद्रातील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते. शाळा पुर्व तयारी मेळाव्याची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. केंद्रे ई.एस. यांनी केले तर व प्रास्ताविक श्री काळे सर यांनी केले .


श्री शिंदे सर यांनी शाळा पुर्व तयारी मेळावा याविषयी माहिती सांगितली व त्यानंतर सौ.गायकवाड मॅडम व सौ कुलकर्णी नभा मॅडम यांनी आपले अनुभव कथन केले . त्यानंतर श्री केंद्रे ई.एस. सर यांनी मेळावा उद्दिष्टे ,स्वरुप व कसा आयोजित करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थी कार्ड तसेच पहिले पाऊल पुस्तिकेविषयी सखोल माहिती सांगितली. त्यानंतर श्री केंद्रे सर व शिंदे सर यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढुन सात टेबल ठेवलेल्या खोलीचे उद्घाटन करण्यात आले .


प्रशिक्षणार्थी असलेल्या सौ.नरंगले मॅडम व सौ.वांगे मॅडम व सौ कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थी व पालकांची व अंगणवाडी ताईंची भुमिका सुंदररित्या पार पाडले . सातही टेबल वरील कृतीत श्रीम.पाटोदेकर मॅडम ,श्रीम. आलेवाड मॅडम , सौ.लोलगे मॅडम सौ.देशमुख मॅडम ,सौ जोशी मॅडम यांनी सुंदरीत्या काम पार पाडले , केंद्रातील शिक्षक शिक्षिका यांच्या मदतीने प्रशिक्षणातील कार्य करुन घेण्यात आले त्यानंतर केंद्रप्रमुख श्री काळे सर ,सरपंच म्हणुन सौ.डांगे ,मॅडम शा. व्य समिती अध्यक्ष श्री सोनकांबळे सर यांचे मनोगत घेण्यात आले . एकंदरीत केंद्रस्तरीय मेळावा साहित्यासह उत्कृष्ट घेण्यात आला.
