
नांदेड। लंपीस्किन आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली वरुन आलेल्या केंद्रीय पथकाने मुखेड आणि नायगाव तालुक्याला भेट देऊन पहाणी केली आणि तालुका लघुपशुसर्वचिकित्सालय नायगाव येथे बैठकीत क्षत्रिय स्तरावरील काम करणाऱ्या पशुवैद्यकाकडून आढावा घेऊन माहिती घेतली आणि तात्काळ जनावरांची मरतुक नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन केले.


याप्रसंगी आयुक्त कार्यालय पुणे येथुन उपस्थित डॉ देवेंद्र जाधव सर, डॉ हुलसुरे सर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ नानासाहेब सोनवणे सर, उपायुक्त डॉ मधुसूदन रत्नपारखी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त डॉ सखाराम खुणे, डॉ प्रविण घुले,पविअ तांत्रिक डॉ अरविंद गायकवाड, सर्व तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार आणि मुखेड,देगलुर,बिलोली आणि नायगाव तालुक्यातील सर्व संस्था प्रमुख उपस्थित होते.

