
नवीन नांदेड। बळीरामपुर गावाच्या विकासासाठी आपसातील मतभेद मतभेद विसरून एकत्र यावे, गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही अशी ग्वाही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे गोदावरी ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड औद्योगिक वसाहत एम आय डीसी नांदेड व बळीरामपूर ग्रामपंचायत च्या वतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बसविण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यात केले.


बळीरामपुर ग्रामपंचायत कार्यालय व एम आय डी सी औद्योगिक वसाहत येथील गोदावरी ड्रग्ज कंपनी यांच्या वतीने बळीरामपुर भागात साहा पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत त्याचे लोकार्पण नांदेड दक्षिण चे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे व गोदावरी ड्रग्ज कंपनीचे गिरीश देशपांडे व मान्यवर यांच्या हस्ते २१ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी बळीरामपुरच्या गावाच्या विकाससाठी आपसतले मतभेद,राजकारण मिटून सर्वांनी एकत्र यावे,मी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मोहनराव हंबर्डे यांनी दिली.


यावेळी गोदावरी ड्रग्स या कंपनी चे कौतुक करून आमदार हंबर्डे यांनी गावाच्या विकासासाठी आजूबाजूच्या कंपन्यांनी सुद्धा गोदावरी ड्रग्स चे अनुसरन करून आपला विकासाचा एस आर निधी बळीरामपूर ग्रामपंचायतला देऊन गावाच्या विकासाला हातभार लावावे असे आवाहन केले .यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रतिनिधी आनंद गुंडले यांनी सुद्धा बळीरामपूर च्या विकासामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही अशी ग्वाही दिली.


यावेळी सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पांचाळ यांनी गावच्या समस्यांचे विस्तृत असे विवेचन आमदार मोहन हंबर्डे यांच्यापुढे मांडले व गोदावरी ड्रग्स लिमिटेड चे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले. बळीरामपूरचे उपसरपंच नागेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य किशन गव्हाणे, माजी सरपंच नागोराव आंबटवार,कपिल सोनकांबळे, राम शिंदे, संभाजी आढाव रवी भंडारे, ज्ञानोबा दासरवाड, डोईबळे मामा, माजी सरपंच विश्वंभर फुले, नरसिंग गडपवार, शेख जाकीर, बालाजी मॅनेट्वार ,सूर्यकांत सबनवार, बबन जोंधळे, जमील अत्तार तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संतोष तेलंग यांनी केले.
