
नांदेड। दि.23 फेब्रुवारी पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर माकपच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषण व धरणे आंदोलनातील मागण्या तातडीने सोडवाव्यात यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.१७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली व जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांची भेट घेतली आहे.


माकप,सीटू आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनातील काही मागण्याची प्रशासनाने दखल घेतली आहे.
परंतु मांजरम ग्रामपंचायत येथे २४ लाख ५० हजार ७३४ रुपयाचा अपहार झाला हे सिद्ध झाले असून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे उपोषणार्थी गंगाधर मेडकर (पहेलवान), रावसाहेब मेटकर हे साखळी उपोषण करीत आहेत. वझरा शेख फरीद ता. माहूर गावठाण विस्तारवाढ संदर्भात गट विकास अधिकारी श्री कांबळे हे लवकरच अहवाल सादर करतील असे तहसीलदार माहूर यांनी सांगितले.


नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर शाळेवर कारवाई करावी तसेच शाळेला अभय देणाऱ्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्रा.) व गट शिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. नांदेड जिल्यामध्ये पोलीस संरक्षण परवानासाठी अहवाल सादर करतांना काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन चुकीच्या लोकांना शस्त्र परवाना व पोलीस संरक्षण दिल आहे.या संदर्भात चॊकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.


राज्य व केंद्र शासनाच्या विविध कार्यालयात कार्यकाळ संपूनही वसिलेबाजीने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची तळ ठोकून आहेत व आर्थिक लूट करीत आहेत त्यांची बदली करावी.माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.)यांनी बोगस विकास कामे दाखवून करोडो रुपये निधी उचलून अपहार केला आहे त्यांची चॊकशी करून कारवाई करावी. तसेच परिक्षेत्रातील सिटू च्या वन कामगारांना कामावर घेतले नाही त्यांना कामावर घावे. मौजे मांजरम येथील उपोषणार्थी गंगाधर मेडकर यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात.

शहरातील बजरंग कॉलनी, कर्मवीर नगर, गुरु नगर शिवपार्वती नगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअर बसवून द्यावेत. घरेलू कामगारांना अनुदान रक्कम दहा हजार वाटप करावी व मागील वर्षाप्रमाणे युनियनच्या मागणी प्रमाणे नूतनिकरण करावे.आदी मागण्यासह इतरही मागण्या अजून अपूर्ण आहेत. आंदोलनाचे नेतृत्व माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.श्याम सरोदे,कॉ. जयराज गायकवाड, कॉ. शुभाषचंद्र गजभारे,कॉ.सोनाजी कांबळे,गोपीप्रसाद गायकवाड, गंगाधर खुणे,रावसाहेब मेडकर, साई सरोदे आदींनीजन करीत आहेत.आंदोलनास पुढील आठवड्यात दोन महिने पूर्ण होणार आहेत.
