
हिमायतनगर| रमजान ईदचा उत्सव काही दिवसावर आला असून, ईद साजरी करताना हिंदू – मुस्लिम भाई – भाई व सामाजिक एकतेचा संदेश कायम ठेऊन उत्सव साजरा करावा तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता आनंदाने ईद साजरी व्हावी असे आवाहन पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी केले.


ते रमजान महिन्यातील दि.20 एप्रिल गुरुवार दरवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिमायतनगर येथील दारुल उल्लूम मस्जिदमधील इफ्तार पार्टी प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी जी प सदस्य सुभाष राठोड,साहाय्य्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, गजानन सूर्यवंशी, कृउबाचे माजी संचालक शे.रफिक सेठ, राजीव बंडेवार, प्रवीण कोमावार, संजय माने, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, अश्रफ भाई, फेरोज कुरेशी, असद मौलाना, मनानं भाई,पंडित ढोणे, सादिक चाथारकर, योगेश चिलकावार, ऍड नवीन ठाकूर, अंकुश मोरे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्त शिराने, अशोक अंगुलवार अनिल मादसवार, धम्मा मुनेश्वर, अल्ताफ पत्रकार, जुबेर पत्रकार, युनूस शेवाळकर, सर्व धर्मीय नागरिक, व्यापारी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक भुसनूर म्हणाले कि, सध्या सर्वत्र अफवांचे पेव पसरत आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊं नये. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्य विधान, मेसेज फारवर्ड करू नये, जेणे करून जातीय सलोखा बिघडेल. असे मेसेज दिसली तरी ती डिलीट करून शांतता व सुव्यवस्था पाळावी. आणि हिंदू मुस्लिम बांधवानी हिमायतनगर शहराची शांततेची परंपरा कायम ठेऊन सण – उत्सव साजरे करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. इफ्तार पार्टीसाठी कुलकर्णी व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

