
नवीन नांदेड। अक्षय तृतीयासाठी मोठया प्रमाणात सिडको परिसरातील बाजारपेठेत कुंभार व्यवसायीकांनी कळसा बिंदगी तर ग्रामीण भागातील महिलांनी पळसाची पत्रवाळी व विविध प्रकारच्या आंबा ही उपलब्ध करून दिला असून मोठ्या प्रमाणात खरेदी साठी बाजारपेठ मध्ये गर्दी झाली आहे.


हिंदू संस्कृती मध्ये अक्षय तृतीया ला फार मोठे महत्त्व असून तिन दिवसा मध्ये कळसी बिंदगी पुजा करण्यात येते, गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार व्यवसायीक असलेले साई हिवरकर,विश्वनाथ हिवरकर, कहाळेकर, हा व्यवसाय करत असून अक्षय तृतीया साठी बिंदगी कळस हे करत असून या व्यवसायातुन उदर निर्वाह चालत असल्याचे सांगितले.


तर पुजेसाठी पळसाच्या पानांची पत्रवाळी करणारे ग्रामीण भागातील महिला पुरुष ही मोठया प्रमाणात बाजारपेठ मध्ये आले आहेत. १९ ते २२ एप्रिल दरम्यान या पुजेला महत्त्व असून सिडको बाजारपेठेत हापुस, दसेरी,कलमी यासह विविध प्रकाराचा आंबा उपलब्ध झाला आहे, अक्षय तृतीया साठी खरेदी करण्यासाठी नागेली पान, फुले, यासह विविध साहित्य घेण्यासाठी सिडको बाजारपेठेत महिला युवक नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे.

