
नायब तहसीलदार राम बोरगावकर यांची तहसीलदार म्हणून पदोन्नती -NNL

लोहा। तालुक्याचे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर यांची तहसीलदार म्हणून पदोन्नती झाली आहे. त्याच्या या निवडी बद्दल त्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे व सहकारी मित्रांनी अभिनंदन केले.
पदोन्नत तहसीलदार राम बोरगावकर हे चार वर्षां पूर्वी लोहा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रुजू झाले पुरवठा विभाग सुरळीत केला शिवाय राशन दुकानात वेळेवर माल पोहचविणे व त्याचे वितरण याला त्यांनी प्राधान्य दिले.
पारदर्शीपणा आणला शिवाय गरजवंत याना तातडीने राशन कार्ड उपलब्ध करून दिले तसेच संजय गांधी निराधार योजनेनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा. यासाठी त्यांनी आपल्या विभागाला गतिमान केले शिवाय विविध शैक्षणिक प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेवर कसे मिळतील यासाठी त्यांची प्रयत्न असत आणि विद्यार्थ्यांना समुपदेशन केले.
नायब तहसीलदार म्हणून राम बोरगावकर यांचा कार्यकाळ तालुक्यातील अभ्यंगताना मोठा आधार ठरला. त्याचे तहसीलदार म्हणून बढती झाली त्या बद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकले, नायब तहसीलदार संजय भोसीकर, तलाठी संघटनेचे मारुती कदम, मंडळ अधिकारी , कोतवाल संघटनेचे अध्यक्ष माधव काकडे यासह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.