
नवीन नांदेड। नुकत्याच झालेल्या नांदेड पोलीस भरती मध्ये बळीरामपूर एमआयडीसी भागातील चार विद्यार्थिनी यश संपादन केल्या बदल ग्रामपंचायत कार्यालय बळिरामपुरचे संरपच प्रतिनिधी इंद्रजित पांचाळ व सदस्य यांनी सत्कार करून अभिनंदन केले.


नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेत कुं कोमल जयदीप नोबतकर, कुं.शिवानी लक्ष्मण कांबळे,कुं.पल्लवी विजय वाघमारे, कुं.आरती राजू सोनकांबळे या विद्यार्थिनींनी नुकत्याच झालेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रियेत घवघीत यश मिळवले आहे.


या पैकी शिवानी कांबळे ने नांदेड जिल्ह्यात प्रथम येत यश मिळवलं आहे,या सर्व विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत,त्यांचे पालक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात,आणि त्यांच्या मुलींनी पोलीस भरती मध्ये यश संपादन करून नावलौकिक मिळवला आहे.


त्यांच्या या यशाबद्दल बळीरामपूर ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पांचाळ, ग्राम पंचायत सदस्य किशन गव्हाणे, वाघमारे यांनी यांचे पुष्पहार घालून स्वागत , सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व
या वेळी सर्व विद्यार्थिनींच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
