
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुलात एम. एड चे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या चतुर्थ सत्रातील विद्यार्थ्यांचा छात्र सेवाकाल विष्णुपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्या बी. एड अध्यापक महाविद्यालयात गेल्या १८ एप्रिल पासून सुरू होता. त्याचा समारोप कार्यक्रम याच महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये आज संपन्न झाला.


शिक्षणशास्त्र पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संबधित महाविद्यायातर्फे शिक्षणाचा एक भाग म्हणुन दरवर्षी छात्र सेवाकाल घेतला जातो. छात्र अध्यापक या छात्र सेवकाल दरम्यान आपल्यातील अध्यापन कौशल्य अध्यापनाच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करतात. सदर छात्र सेवाकाल शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकू कुमार सिंग, माजी संचालक तथा विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत बाविस्कर, माजी अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील व डॉ. जयंत बोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या व संबधित अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकु कुमार सिंग विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत बाविस्कर, माजी अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, डॉ. महेश जोशी, डॉ. भीमा केंगले, प्रा बोरगावकर या प्रसंगी उपस्थित होते. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोग अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर हे होते. या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रा पतंगे यांनी केले तर सूत्र संचालन प्रशांत साबणे यांनी केलं. मनोगत सोनी दिनकर यांनी व्यक्त केले.


या समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास पांचाळ यांनी केले. या छात्र सेवाकालच्या यशस्वीेतेसाठी थोरात ज्योती, दिनकर सोनी, पतंगे सावित्रा, पवार कृष्णा, कांबळे सुरेश, डांगे शिवकन्या, शहाणे पूजा, शेख मेहजबीन, शेख जुबेर, डाके संतोष, डाके सविता, पांचाळ कैलास, लांडगे आनंद, साबणे प्रशांत, शेख मोहिन, कुंभारे साईनाथ, मधळ सोनू, सावंत अश्विनी, म. साजिद, यांनी परिश्रम घेतले. तर सहयोग अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, प्रा डॉ. पचलिंग एस. के, प्रा. अनिल सोनटक्के, प्रा. गजभारे अश्विनी, डॉ किशोर कुलकर्णी,श्री. बालाजी किरकन, श्री. हीवंत अनुरथ, श्री राजेश हंबर्डे, श्री लोखंडे सर यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले अशा भावना छात्र अध्यापकानी या समारोप प्रसंगी व्यक्त केल्या.
