
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांना कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान कुमठे ता.कोरेगाव जि. सातारा च्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा बालसाहित्यातील पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा निवृत पोलीस उपाधीक्षक तथा प्रतिष्ठानचे संस्थापक हणमंतराव जगदाळे यांनी सातारा येथे केली .


प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबरी व बालसाहित्य या विभागात पुरस्कार दिले जातात . यामध्ये यावर्षी ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या वीरभद्र मिरेवाड यांच्या आनंदाची फुलबाग या बालकवितासंग्रहाची निवड परीक्षण समितीचे प्रमुख डाॅ.राजेंद्र माने,सविता कदम यांनी केली आहे . रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मिरेवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

