
नवीन नांदेड| दि.२२ एप्रिल २०२३ रोजी रावसाहेब सुर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र चंदासिंग कॉर्नर ,अण्णा भाऊ साठे चौक तुप्पा येथे महान अस्पृश्योद्धारक, स्त्रीमुक्तीचे प्रणेते,श्रमाला व श्रमिकांना प्रतिष्ठा देणारे समतानायक,क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .


या प्रसंगी प्रमुख उपस्थिती समतावादी एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन,नांदेड चे जिल्हाध्यक्ष मा. बालाजी पाटोळे यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षा केंद्रास शुभेच्छा दिल्या आणि महात्मा बसव्वान्न यांच्या कार्याची महती सांगीतली. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर शिवराज आप्पा वानोळे,लोकस्वराज्य आंदोलन प्रणित समतावादी एम्प्लाॅईज आॅर्गनायझेशन, नांदेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटोळे ,रयत सेवाभावी संस्थेचे संचालक तथा सत्यशोधक समाज, अभा अनिसचे प्रा.इरवंत सुर्यकार मा.बंडू फुले,सचिन वानोले, सक्षम सूर्यकार आदींची उपस्थिती होती.

