
हिमायतनगर| हिमायतनगर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रनधुमाळी चालू झाली असून, उमेदवारी परत घेण्याचे शेवटच्या दिवशी ३४ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता १८ जागेसाठी ५२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यानंतर तीनही पैनलकडून प्रचाराला सुरुवात झाली असून, मतदारांच्या दारी जाऊन मार्केट कमिटीच्या निवडुनिकित आमच्या पाइनलाल निवडून द्या आम्ही शेतकरी हिताचे कामे करू असे आश्वासन दिले जात आहे.


कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या २८ एप्रिलला मतदान होणार आहे. सेवा सहकारी सर्वसाधारण गटातून २२, सर्वसाधारण महिला ०६, इतर मागासवर्गीय ०३, विमूक्त भटक्या जाती, जमाती ०३, ग्रामपंचायत गटामधून सर्वसाधारण ०६, अनू जाती व जमाती ०३, अर्थिक दुर्बल घटक ०२, हमाल मापाडी ०२, आडत व्यापारी ०५ असे एकूण ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १८ जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.


या ठिकाणी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – राष्ट्रवादी, बाळासाहेबांची शिवसेना – भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी ही बैठकी घेऊन जोरदार तयारी केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे लोक नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपली ताकद पणाला लावली असून, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही निवडणुकीकडे जातीने लक्ष घातले आहे.


त्यामुळे या निवडणूकीत रंग भरला गेला असून, चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मुख्य चौकात बैनरबाजी करण्यात आली असून, या बैलांवर दिसणारे उमेदवरांचे फोटो पाहिल्यास नाराज राष्ट्रवादीचे काही जण काँग्रेसकडून तर भाजपचे काहीजण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान योग्य उमेदवार मिळत नसल्याने विरोधी गटाच्या उमेदवारास आपल्याकडे खेचून घेत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न तीनही पैनलकडून होताना दिसून येत आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नसल्याने सोशल मीडियावर याबाबतची चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

आगामी २६ एप्रिलला एका शाळेच्या उद्घाटनासाठी पालक मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील यासह अनेक, शिंदे गट, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक आजी माजी आमदार, खासदार व मोठे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
