
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील वडसा येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून नागनाथ मंदिर निकट जेसीबी च्या साहाय्याने महसूल विभागाच्या नाका वर टीचून या भागातील वाळूमाफिया महसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता दिवसा ढवळ्या वाळूचोरी करीत आहेत.आज दिनांक २३ रविवार रोजी तर दुपारी १२ च्या सुमारास या ठिकाणी उत्खन व वाहतूक करणाऱ्या वाहनांचा बाजारच मांडला गेला होता त्या ठिकाणी महसूल च्या अधिकाऱ्यांची ” विजीट ” सुद्धा झाली.मात्र आओ चोरों बांधो भारा…. आधा तुम्हारा आधा तुम्हारा आधा हमारा म्हणून समेट घडून आल्याची जोरदार चर्चा असून नोट कॅम्प चे फोटो आमच्या प्रतिनिधी कडे प्राप्त झाल्याने हाताच्या काखण्याला आरसा कशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.


एकीकडे शासनाकडून पर्यावरणाचा रास थांबविण्यासाठी बेसुमार वाळू उपसा वर नियंत्रण मिळण्याकरिता स्वस्त दरात वाळू देण्याचे नियोजन करण्यात आले असताना दुसरीकडे मात्र माहूर तालुक्यात महसूल विभागाच्या मधुर हित संबंधामुळे पैनगंगा नदी पात्राची अब्रू लुटली जात आहे. तालुक्यातील वडसा येथे मशीन च्या साहाय्याने ट्रॅक्टर, टीप्पर,हायवा, च्या साहाय्याने रेतीचे उत्खनन व वाहानातून करण्यात येत आहे.विशेष म्हणजे वाळू माफिया कडून ” चोरी चा मामला हळू हळू बोंबला ” या उक्तीला फाटा देत दिवसा प्रशासनाच्या कुठल्याही विभागाला न जुमता ही वाहतूक सुरू आहे.


माहूर तालुक्यातील वडसा येथे वाळूचा बेफाम उपसा आज रविवार रोजी दिवसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागनाथ मंदिर परिसरात असलेला साठा आणि नदीत खोल खड्डे खोदून हा वाळू उपसा सुरु असल्याचा प्रकार नोट कॅम्प च्या फोटो मध्ये लोकेशन आणि वेळेसह समाज माध्यमावर प्रसारित झाला असून याची खबर महसूल प्रशासनाला नाही असे नाही,या उलट “विजीट” मधून चांगभले करून घेण्याचा प्रकार उदयास आला असून जिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी विशेष पथक नेमून अवैध उत्खनन वर आळा घालावा अशी मागणी होत आहे.

