
नवीन नांदेड| राष्ट्रवादी व्यापार व ऊधोग आघाडीच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी शेख अजिमोदीन हसनसाब यांच्या नियुक्ती जिल्हा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव यांनी नियुक्ती केली आहे.


सामाजिक तथा राष्ट्रवादी पक्षात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत शेख अजिमोदीन हसनसाब यांच्यी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश एकनाथ फाटे तसेच जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उद्योग व व्यापार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे.


आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उद्योजक व व्यापाऱ्यांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल असा उल्लेख नियुक्ती पत्रात केला आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे देवराव टिपरसे,संघरतन कोकरे, विनोद लोणे, ज्ञानेश्वर इंगोले, बबलू शेख, संतोष गवाले, शेख हुसेन, व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

