
नवीन नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे,२३ एप्रिल रोजी जागतिक ग्रंथदिना निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले होते, या सोहळ्याला परिसरातील वाचक वर्ग व युवक महिलांनी मोठया संख्येने प्रतिसाद दिला.


ग्रंथ दिना निमित्ताने या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अभियंता मदनेश्वर शूरनर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षिय भाषणात प्रबोधनकार गोविंदराम म्हणाले, ग्रंथ निर्मिती पासुनच जगाची प्रगती झाली असुन, त्यातूनच संशोधनाला सुरूवात होऊन अंतराळात जाण्याची स्पर्धा देशा देशात लागली आहे. ग्रंथ हेच माणसाचे गुरू आणि मित्र ठरू शकतात, त्यासाठी प्रत्येकांनी ग्रंथ मित्र करून वांचन संस्कृती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी केले. या कार्यक्रमाला विलास जंगले, शेषराव कांबळे,शंकर रघुजीवार, साईप्रसाद देवकते,सौ .सावित्रा शूरनर,सौ.ममता पतंगे, सौ.अनिता राठोड, सौ.ज्योती कसनकर, सौ दुर्गेताई, नरेन्द्र रघुजीवार, दुर्गेश कसनकर, राहुल ढवळे, कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

