
हदगाव, शे.चादपाशा| हदगाव शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोथान महाभियान अतर्गत वाढीव पाणी पुरवठ्याला शासनाकडुन 46 कोटी 77 लाखाचे निधी असुन, या कामी केवळ घाईघाईनं कामे करुन केवळ कामाचा दर्जा न पाहता केवळ बीले काढण्याचा सपाटा सुरु असल्याने या बाबतीत हिगोली लोकसभाचे माजी खा यांनी थेट मुख्यमंत्री यांनाच लेखी तक्रार केल्यामुळे खळबळ माजलेली आहे.


त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आहे की सदर हदगाव शहरात वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी हदगाव शहरातील सातत्याने भेडसावत असलेल्या पाणीटंचाई बाबतीत शासनाने मंजुर केलेल्या कोट्यावधी निधीच न.पा. प्रशासन द्वरे योग्य नियोजन होत नसल्याने परिणाम स्वरुप न.पा. प्रशासनातील संबधीत अधिकारी व संबंधित ठेकेदार हे या योजनेत नमुद केल्याप्रमाणे अटीचे पालण न करता केवळ थातुर मातुर कामे दाखवून बिले काढण्याचा सपाटा लावला असल्याच गंभीर आरोपही माजी खासदार यांनी आपल्या तक्रारीत केलेले आहे. इतकेच नव्हे ठराविक कालवधीत चौकशी न केल्यास संबंधित दोषीवर कारवाई न केल्यास नाईलाजाने शेवटी आपणास न्यायालयाकडे दाद मागू अस माजी खा सुभाष वानखेडे यांनी सदर प्रतिनिधीशी अशी माहीती दिली.


धाबे दणाणले …
महाराष्ट्र सुवर्णजंयती नगोरथन महाभियान अतर्गत 46कोटी 77लाख रु असुन सदर काम ‘समीर जोशी नामक कन्सल्टट ने घेतले आहे माञ हे काम एक माजी नगरसेकाच्या देखरेख खाली होत असल्याची चर्चा असुन, ते नगरसेवक नेहमी न.पा.च्या लेखा विभागात नेहमी दिसुन येतात. या मागच ‘गौडबंगाल ‘काय असेल असा नेहमीच येथील काही कामा निमित्त येणा-या नागरिकांना प्रश्न पडतो आहे अणखी विशेष म्हणजे हिगोली लोकसभाचे माजी खा सुभाष वानखेडे सहसा कुणाच्याही विरोधात तक्रारी करित नाही. कुठं तरी या प्रक्रणात त्यांना ‘तथ्य ‘दिसल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री यांचेकडे या बाबतीत दिली. आणखी विशेष म्हण- जे या पुर्वी दहा वर्ष हदगाव नगरपरिषद त्याच्याच ताब्यात होती वाढीव पाणी पुरवठाचा प्रस्ताव त्यांची न.पा.त सत्ता असतांना तात्कालिक नगराध्यक्षा द्वरे शासनाकडे पाठविण्यात आले होते हे उल्लेखनीय आहे.

