
नांदेड। जिल्ह्यातील नायगाव येथील जाहिर सभेत दिव्यांग निधी पंधरा लाख ऐवजी अठरा लाख देण्यांचे आश्वासन डिसेंबर २०१९ ला आमदार राजेश पवार यांनी दिल होत. यास चार वर्षे लोटली मात्र अद्यापही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. असे म्हणून आमदार साहेब दिलेलं अस्वासन कसे विसरले असा सवाल दिव्यांग मंडळ अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी उपस्थित केला आहे.


नांदेड जिल्ह्यातील सोळाहि तालुक्यातील दिव्यांग वयोवृध्दाना केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांग वयोश्री साहित्य शिबिर मोठ्या उत्साहाने प्रत्येक मतदारसंघात आमदार यांच्या हस्ते घेऊन शिबिरात दिव्यांग वयोवृध्दाची तपासणी डिसे.२०१९ ला घेऊन करोडो रूपयेचे साहित्य,तिनचाकि सायकल, व्हिलर,कुबड्या,काठ्या, चष्मे, चार्जिंगच्या सायकल, दाताच्या फण्या,चष्मे, अंधांसाठी मोबाईल, इत्यादी साहित्य आजपर्यंत का वाटप झाले नाहि ते पंचायत समितीच्या पटांगणात का गंज खाते.


या बद्दल सर्व तालुक्यांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी अनेक निवेदन देऊन आंदोलन केले असता आतापर्यंत कोणत्याही आमदाराला कशी दिव्यांगाची आठवण आली नाहि. निवडणुकीत दिव्यांग वृध्द निराधार गोरगरिबांचे कैवारी म्हाणारे व संसदेत अनेक कायदे मंजूर करणाऱे आमदार महोदय, दिव्यांग बांधवांसाठी आपल्या मतदारसंघात दिव्यांग निधी का वाटप होत नाहि?


मा.राजेशजी पवार साहेब आपणच नायगाव येथील जाहिर सभेत दिव्यांग निधी पंधरा लाख ऐवजी अठरा लाख देण्यांचे आश्वासन डिसेंबर २०१९ ला दिलं होतं. मात्र आश्वासन देऊन लोकप्रतिनिधीच पाळत नसतील तर प्रशासकिय अधिकारी कसे पालन करतील. नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदारांना जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या तर्फे दिव्यांग निधीची तरतूद करावी असे पत्र देऊन सुद्धा दिव्यांगाना न्याय मिळत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी व्यक्त केली.
