
लोहा| रझाकारांच्या जोखडातून मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्याच्या वीर योद्धानी आपल्या प्राणांची आहुती दिली.या स्वातंत्र्य लढ्यात लोहा कंधार मधील भूमीपुत्रांनी मातृभूमीच्या मुक्तीसाठी आपले बलिदान दिले मराठवाडा मुक्ती लढ्यात टेळकी, लोहा वडगाव, कल्हाळी यासह लोहा कंधार भूमीतील भूमिपुत्रांनी रझाकार विरोधात लढा दिला हौतात्म्य पत्करले त्या वीर भूमिपुत्रांना आणि लढ्यातील शूर योध्याचा लढा नव्या पिढीला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.


मराठवाडा_मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत_महोत्सवी_वर्षानिमित्त टेळकी ( ता लोहा ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वतः च्या जीवाची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक टेळकी ( तालोहा ) येथे व्याख्याते प्रा नागेश कल्याणकर यांनी मराठवाडा मुक्ती लढ्यावर विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील लोहा कंधार तसलुक्यातील भूमीच्या लढ्याला उजाळा दिला इतिहास सांगितलं ज्या भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले त्याच्या अभिवादन करून त्याच्या बलिदानामुळे ही भूमी रझाकराच्या जाचातून मुक्त झाली या लढ्याचा इतिहास नव्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणा देणारे आहे असे मार्गदर्शन केले.


यावेळी स्वातंत्रसैनिकांच्या पाल्यांचा सत्कार/सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील. शिंदे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके , माजी सभापती शंकरराव ढगे, वनिताताई मोरे,सरपंच संदिप देशमुख,बालाजी संगेवार,साहेबराव मोरे, शंकरराव मोरे,माधवराव मोरे, माणिकराव मोरे, सोनबाराव हंबर्डे,साहेबराव,संदिप देशमुख, विजय जाधव,यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सर्व स्वयंसेवक, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

