
नांदेड| मध्य रेल्वे मध्ये छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्थानकावर प्लातफोर्म क्र. 10 आणि 11 चा विस्तार करण्यात येत असल्यामुळे काही दिवस लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचलना वर परिणाम झाला आहे.


नांदेड रेल्वे विभागातील आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 11402 आदिलाबाद – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस दिनांक 23 एप्रिल ते 30 सप्टेंबर, 2023 दरम्यान दादर पर्यंतच धावणार आहे. दिनांक 23 एप्रिल ते 30 सप्टेंबर, 2023 दरम्यान दादर ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्वावी हि विनंती.

