
नांदेड। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ढाकणी गावातील एका गरीब परिवारातील पिटलवाड कुटुंबातील वर दिपक व मांजरमवाडी येथील रेजिनवाड परिवारातील वधू संजना यांच्या शुभविवाह छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे नांदेड दक्षिण अध्यक्ष गोविंद पाटील ढाकणीकर यांच्या पुढाकारातून २३ एप्रिल रोजी ढाकणी ता. लोहा या गावातील व छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड पदाधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा शुभविवाह सोहळा संपन्न झाला.


छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचा नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील ढाकणीकर यांच्या वतीने आयोजित गरीब कुटुंबातील पिटलवाड व रेजिनवाड परिवारातील शुभविवाह लावून एक आदर्श उपक्रम राबविला आहे, २३ एप्रिल रोजी सकाळी १२.२५ वाजता वाघ वाजंत्री व मंगलाष्टके यांच्या सप्तसुरात हा विवाह सोहळा संपन्न झाला, या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ यांच्या सह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती.


ढाकणी ता. लोहा येथे गरीब कुटुंबातील पिटलवाड व रेजिनवाड शुभविवाह २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, आयोजक तथा संयोजक छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड दक्षिण अध्यक्ष गोविंदराव पाटील ढाकणीकर यांनी या शुभविवाहाची सर्व जबाबदारी घेऊन हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या शुभविवाह सोहळ्याला आशिर्वाद देण्यासाठी प्रदेशध्याक्ष गिरीश जाधव, संजय भोसिकर, भाजयुमो नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील घोगरे, प्रदेश कोषाध्यक्ष गजानन कहाळेकर,भिम कायदा संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विलास गजभारे,मराठावाडा अध्यक्ष मराठा आरक्षण समिती शिवाजी हंबरडे, प्रदेश कोषाध्यक्ष संजय पाटील कदम, बालकिशन पाटील, बालाजी पाटील बंसवते, विकास कौडगावकर , सतिश पाटील शिंदे चंद्रकांत कल्याणकर,संतोष बसवंते, दता पाटील खराटे,यशवंत आवळे, राम पाटील कदम, सर्व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा शुभ विवाह सोहळा संपन्न झाला, शुभविवाह निमित्ताने हा सोहळा सामाजिक बांधिलकी जोपसणारा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आहे.

