
नांदेड। हे पावसाळ्यातले चित्र नव्हे….आजचा दिनांक आणि स्थळ आपणास स्पष्ट दिसतो आहे. देश – विदेशातून तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना नांदेड येथील गोकुळनगर पोलीस चौकी समोर अशा घाणेरड्या पाण्यासह जीवघेण्या रस्त्याचे दर्शन घडविले जात आहे.


या रस्त्यावरून महानगरपालिकेत सत्ता असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्यात ज्यांची सत्ता आहे असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी सुद्धा या रस्त्याने मार्गक्रमण केलेले आहे.


अशांनी याकडे पाहिल्यानंतर आता आम्ही कुणाकडे तक्रार करावी अशी भावना येथील नागरिक श्री शंकर झांगडे यांनी केली आहे. प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या गैरसोयीसह स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेडला गालबोट लावणाऱ्या याकडे महानगरपालिका लक्ष देईल का ? हा खरा प्रश्न.

