
नांदेड| लक्ष्यवेध फाउंडेशन व जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारत माझा देश आहे हा वैचारिक उपक्रम लक्ष्यवेध या देशभक्ती आणि सामाजिक परिवर्तनासाठी स्थापित झालेल्या स्वयंसेवी संस्थेच्या उद्घाटनाप्रित्यर्थ आज दिनांक 25 एप्रिल रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील एक हजार मुख्याध्यापक आणि जिल्ह्यातील शिक्षण विभागातील तीनशे अधिकारी या उपक्रमात सहभागी होत आहेत.


सर्व पाठ्यपुस्तकात पहिल्या प्रारंभीच्या पृष्ठावर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा प्रकाशित करण्यात आली आहे. आठ ओळी अथवा आशय असणाऱ्या या भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेत विद्यार्थ्यांवर राष्ट्रभक्तीचे कसदार संस्कार करण्यात आले आहेत. परंतु प्रतिज्ञा हा अभ्यासक्रमाचा भाग मानला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रतिज्ञेच्या कसदार संस्कार आणि मानवी जीवन मूल्यांच्या शिकवणीपासून वंचित राहत आहेत.


आज समाजात जातीभेद, धर्मभेद, विषमता या दुर्गुणांनी थैमान घातलेले आहे. शालेय जीवनात बालकांवर केलेले राष्ट्रभक्ती आणि मानवतेचे संस्कार आयुष्यभर अमीट राहतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन लक्ष्यवेध फाउंडेशन आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख हे या प्रबोधन कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे आदी अधिकारी या प्रतिज्ञा प्रबोधन कार्यशाळेत सहभागी होत आहेत. माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. संपन्न होत अशी माहिती स्वागताध्यक्ष कामाजी पवार आणि पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, शिवा कांबळे, शिवाजीराजे पाटील बाभळीकर, जगन शेळके, फाउंडेशनचे सचिव डॉ हनुमंत भोपाळे, खजिनदार शिवाजीराव कपाळे व सहसचिव संगमेश्वर लांडगे यांनी दिली आहे.
