
नांदेड| कंत्राटी सुरक्षा रक्षक व पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन मनपाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे आयटक प्रणित मराठवाडा न.पा.,मनपा युनियनच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील कंत्राटी पाणीपुरवठा व सुरक्षा कर्मचार्यांना किमान वेतना नुसार वेतन अदा करावे, पीएफ, ईएसआय कपात करावे, आठवडी सुट्टी किंवा त्याचा मोबदला अदा करावा या व इतर मागण्यांसाठी आयटक प्रणित मराठवाडा न.पा., मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने सोमवारी मनपा समोर धरणे आंदोलन करण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत सहाय्यक आयुक्त गुलाम सादीक यांनी कंत्राटदाराला किमान वेतन व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. तर पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत.


या चर्चेच्यावेळी कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.शिवाजी फुलवळे यांच्यासह कंत्राटी कामगार कॉ.सतीश मुगटकर, कॉ.नरसिंग भोसले, कॉ.किरण खंदारे, कॉ.सूर्यकांत कांबळे हे उपस्थित होते. तर या आंदोलनात कॉ.एकनाथ घुले, कॉ.चंद्रकांत गवळे, कॉ.राजू खाडे, कॉ.विश्र्वनाथ गोडबोले, कॉ.धोंडीराम बासटवार, कॉ.वसंत पावडे, कॉ.रामराव एडके, कॉ.रोहिदास गोडबोले, कॉ.आनंदा गायकवाड, कॉ.विकास सोनकांबळे, कॉ.सुनिल कांबळे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

