
हिमायतनगर। सरसम बु येथिल अपर्णाबाई श्यामराव देशमुख यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना मुंबई येथिल कोकीलाबेन रूग्णालयात भर्ती करण्यात आल होत. दि २५ मंगळवारी उपचारा दरम्यान अल्पश: आजारातच सकाळी ७:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी दि. २६ बुधवारी सकाळी १० वाजता सरसम बु येथे आहे, त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुन , जावई, दिर, भावजयी, नातवंड असा मोठा परीवार आहे.


त्या तत्कालीन हुजपा कारखाण्याचे चेअरमन श्यामराव देशमुख सरसमकर यांच्या पत्नी, मा.बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख यांच्या भावजयी, वसंत कारखाण्याचे चेअरमन अजयराव देशमुख सरसमकर यांच्या काकु, शासकिय गुत्तेदार विक्रांत देशमुख यांच्या आई होत.

