
नांदेड। जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


तसेच जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने जिल्हा हिवताप कार्यालय तथा हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड येथील सर्व कर्मचारी बांधवांना ” शपथ डास निर्मूलनाची ” देण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. त्या प्रसंगी घेतलेलं क्षणाचित्रे…

