
उस्माननगर,माणिक भिसे। उस्माननगर ता.कंधार येथील मागील अनेक वर्षांपासून वास्तव करून ठाण मांडून बसलेले व नविन नुकतेच चालू झालेले देशीदारू दुकान हे गावांच्या बाहेर पाचशे मिटर दूर स्थलांतरित करा. असा ग्रामसभेत करण्यात आलेल्या ठरावात एकमुखी ,हात उंचावून मतदान स्वरूपात नागरिकांच्या उपस्थित देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


सविस्तर माहिती अशी की उस्मानननगर तालुका कंधार येथे मागील अनेक वर्षापासून जि.प. प्रा . शाळेच्या व गावाच्या वस्ती शेजारी असलेल्या दारू दुकान व दुसरे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नुकत्याच नवीन चालू केलेले असे दोन दुकान स्थलांतरित करा या मागणीसाठी गावातील महिला ,नागरिक ,तरुण यांनी आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय व पोलीस स्टेशन उस्माननगर यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर येथील सरपंच श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन २५ एप्रिल रोज मंगळवार ह्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन ग्रामसेवक यांनी केले होते .


यावेळी ग्रामसेविकास सौ. डी. शिंदे यांनी अध्यक्षतेच्या परवानगीने ग्रामसभेचे विषय ग्रामसभेतील विषय नागरिकांना वाचून दाखविल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी हे विषय ऐकल्यानंतर एकच गोंधळ करून दारू दुकाने स्थलांतरित करा अशी आग्रहाचा ठराव घ्या असे नागरीकांनी सूचना केली यावर बराच वेळा ग्रामसभेत चर्चा रंगली विस्तार अधिकारी पंचायत समिती कंधार श्री पानपट्टे यांनी उपस्थित नागरिकांना स्थलांतरित करणाऱ्यांसाठी हात उंच करण्यासाठी सूचना दिली. उपस्थित नागरिकांना विस्तार अधिकारी यांचे बोलणे समजत नसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.डी .भारती यांनी नागरिकांना योग्य असे मार्गदर्शन केल्यानंतर हांत उंच करून मतदान देण्यासाठी सांगितले.


यावेळी उपस्थित नागरिकांनी व महिलांनी बसूनच स्थलांतरित करण्यासाठी हात उंच करून मतदान दिले उपस्थित महिला, नागरिकांनी हात उंच करून ठराव घेण्यास सूचना केली यावरून सर्वानुमते दोन्ही दुकाने स्थलांतरित ५०० मीटर करा असा ठराव सर्वांच्या मते घेण्यात आला. यावेळी अनेकांनी ठरावाचे समाधान व्यक्त केले असले तरीही अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी अशी म्हणण्याची वेळ अनेकांना आली आहे.

या अगोदर वीस वर्षांपूर्वी देखील बराच वेळा दुकाने स्थलांतरित करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन व वरिष्ठापर्यंत अर्ज बाजारी केली होती याची अनेकांनी आठवण करून दिली. २५ एप्रिल रोज मंगळवार या दिवशी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत दारू दुकाने स्थलांतरित करण्याच्या ग्रामसभेत तील ठराव पास झाल्याने आता दुकाने कधी स्थलांतरित होतात ही गोष्ट भुरळ घालणारी आहे.कशी नशीबान थट्टा माडली …आशी ग्रामपंचायत परिसरात चर्चा होतांना दिसत होती.

यावेळी ग्रामसभेत कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी सदस्य व महिला ,नागरीक व तरून मंडळी उपस्थित हेते.देशी दारूचे दोन्ही दुकाने केव्हा स्थलांतरित होतील हे येणारा काळच ठरवेल असा नागरिकातून सुर निघत होता.
