
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरासह तालुक्यातील अनेक गाव परिसरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली हळद भिजून गेली असून, ईतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तासभर मोठ्या प्रमाणात वादळी वारे आल्यामुळे अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले असून, अनेक झाडे देखील जमीनदोस्त झाल्याने ग्रामीण भागात मोठं नुकसान झाले आहे. याच बरोबर शेतकऱ्यांनी जमा केलेलं वैरण उडून गेल्यानं गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान ग्रस्तांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

