
कंधार, सचिन मोरे। कंधार तालुक्यात वादळी वारे व गारपिटीमुळे चांगलेच थैमान घातले असून वीज पडून म्हैस व बैल ठार झाला आहे.या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.


या याबाबद सविस्तर वृत्त असे की दि.२५ एप्रिल रोजी दुपारी १२:३० ते १:३० दरम्यान कंधार शहर व परिसरातील अनेक गावात सोसाट्याचा वादळ वाऱ्यासहित पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रुद्र रूप धारण केले. विजांचा कडकडाटसह कंधार तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंबा.चिकू. हळद.भाजीपाला उन्हाळी ज्वारी टरबूज खरबूज जांभूळ या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


या वादळी वाऱ्यामुळे कंधार लॉ कॉलेज जवळील २ वृक्ष मोडून पडले आहेत तर घोडज रोड व पशुवैद्यकीय दवाखान्यातील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचबरोबर बहादरपुरा येथील प्रगतशील शेतकरी बालाजी पेटकर यांच्या केळी व भाजीपाल्याची मोठी हानी झाली आहे.


आजच्या या आसमानी संकटाने कंधार तालुक्यातील कंधार शहर, बाळांतवाडी, घोडज संगमवाडी आनंदवाडी वाखरड बाचोटी मुंडेवाडी जंगमवाडी बिजेवाडी मानसपुरी कंधार फुलवळ पांगरा संगुजीवाडी भोपाळवाडी बहादरपुरा कोटबाजार गोगदरी चिंचोली नवरंगपुरा या गावांना जबरदस्त फटका बसला असून शेतकऱ्यांची चांगलीच होरपळ झाली आहे.त्यामुळे बळीराजा हवालदार झाला आहे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी शासनाकडे केली आहे.

विज कोसळून म्हैस व बैल ठार..!

दि.२५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या गारपिटीसह प्रचंड आवाज करत कडकडाटासह वीज लालवाडीच्या शिवारात कोसळली त्यात दादाराव बळीराम कुंभारगावे यांचा बैल जागीच ठार झाला तर वीज कोसळून बिजेवाडी येथील दिगांबर बाबुराव लुंगारे यांची म्हैस ठार झाल्याची माहिती तहसीलच्या सूत्राने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
