
नवीन नांदेड। श्री. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सेवादास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित नांदेड चा अध्यक्षपदी डॉ. शेखर घुंगरवार यांच्यी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल आजी माजी पदाधिकारी संचालक व सभासद यांनी अभिनंदन केले आहे.


सेवादास शिक्षक व शिक्षकेतर सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यकारीणी ची बैठक २४ एप्रिल रोजी बैठकीचे अध्यक्ष तथा मनपाचे नगरसेवक पतसंस्थेचे सचिव श्रीनिवास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी विघमान अध्यक्ष कानवटे हे सेवानिवृत्ती झाल्याने त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिव श्रीनिवास जाधव यांनी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्यी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते निवड जाहीर केली.


नुतून अध्यक्ष डॉ.शेखर घुंगरवार यांच्या सचिव तथा नगरसेवक श्रीनिवास जाधव व उपस्थित संचालक सभासद यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे विघमान अध्यक्ष प्रा. एस. व्हि.कानवटे,यांच्या यावेळी संचालक मंडळ यांनी सत्कार केला, सदरील बैठकीस बडवणे, गुडे,देगावकर, थोटे,सौ.शिंदे, सौ. मामीडवार, बाजीराव ताटे, शाम राठोड, यांच्या सह लिपीक सुनिल राठोड व सभासद यांच्यी उपस्थिती होती. नुतून अध्यक्ष डॉ. घुंगरवार याचे सभासद बांधवाना अभिनंदन केले आहे.

