
हिमायतनगर,अनिल मादसवार। अक्षय उर्जा देशाच्या दृष्टीने अत्यंत गरजेची आहे. वाढत्या लोकसंख्ये बरोबर तीची मागणी वाढत आहे. पारंपारिक उर्जा स्ञोञ व त्याचे वाढलेले भाव, वीज पुरवठ्यातील कपात , वाढते प्रदुषण यापासून सुटका करण्यासाठी अक्षय उर्जा महत्वाची आहे. आडीच लाख मॅगावेटची मागणी आहे. अक्षय उर्जा महावितरण घेण्यास तयार आहे. तेव्हा शेतकर्यांनी पडीत जमिनी महावितरणला भाड्याने द्यावी. 5 किमी पर्यत शेतकर्याची जमिन घेण्यास तयार आहे. हिमायतनगरचे पहिले उद्योजक डाॅ. प्रसाद डोंगरगावकर असून, यामुळे तरुणाना प्रोत्साहन मिळेल असे उदगार विश्वासजी पाठक यांनी काढले.


ते हिमायतनगर शहरातुन कारला गावाकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या श्री साई पुर्णानंद ग्रीन एनर्जी प्रा.लि. या 2.4 मॅगावेटचा सोलार प्रोजेक्ट उदघाटन प्रसंगी बोलत होते. सुरुवातीला स्वतंञ संचालक एम.एस.ई.बी. होल्डींग कंपनि लिमिटेडचे विश्वासजी पाठक यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. या प्रसंगी मंचावर प्रदेश अध्यक्ष प्रदिपजी पेशकार, आ. राम पाटील रातोळीकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष व्यकंट पवार, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांच्यासह अनेक मान्यवराचे स्वागत डाॅ. प्रसाद डोंगरगावकर यांनी शाल श्रीफळ, पुष्पहार स्मृतीचिन्ह देवून केले.


उदघाटन कार्यक्रमाला मुख्यअभियंता निबाळकर, अभियंता महापारेशन संजय नलबलवार, अधीक्षक अभियंता भोकरचे तंबाखे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे, सहाय्यक अभियंता पवन भडंगे, गौतमचंद पिंचा, शांतिलाल श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, डाॅ. राजेंद्र वानखेडे, बालाजी कंठेवाड, माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड, चेअरमन गणेशराव शिंदे, प्रविण जन्नावार, कमलाकर दिक्कतवार , डाॅ. पोपुलवाड, माजी संचालक रफिक सेठ, काॅग्रेस शहराध्यक्ष संजय माने, बाळू अण्णा चवरे, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, आदीसह शहरातील अनेक मान्यवर, व्यापारी, जेष्ठ नागरिक, पत्रकार व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.


यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आ..माधवराव पाटील जवळगावकर यांनी 2.4 मॅगावेट सोलार प्रोजेक्ट उदघाटन प्रसंगी बोलतांना म्हणाले,” हिमायतनगर सारख्या दुर्गम भागात सोलार प्रजोक्ट उभा करुन पहिले उद्योजक डाॅ. प्रसाद डोंगरगावकर ठरले असून, येथील विज औरंगाबादला एका कंपनीला जाणार आहे ही अभिमानाची बाब आहे . हिमायतनगरला विजेचा तुटवडा पडणार नाही यासाठी सोलर प्रोजेक्टचा विस्तार करावा अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोप प्रदेशाध्यक्ष उद्योग आघाडीचे प्रदिपजी पेशकार यांनी करताना म्हटले की , सुर्यदेवतेची कृपा आहे. त्यामुळे अक्षय उर्जाला भरपूर वाव आहे. कारखाने जरी औरंगाबादला असले तरी त्यासाठी विज माञ हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातुन मिळत आहे. हे काम उद्योजक डाॅ. प्रसाद डोंगरगावकर यांनी करून दाखवले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा ईतर शेतकऱ्यांनी घेऊन सौर उर्जा प्रकल्प व्यवसायाकडे वळावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन ए.आर. अनगुलवार यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार डाॅ. प्रसाद डोंगरगावकर यांनी मानले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
