
नवीन नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिडको चे शाखाधिकारी विठ्ठल दिंगाबर पवळे हे ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून १ मे रोजी सिडको शाखेच्या वतीने सपत्नीक सत्कार आयोजित करण्यात आला आहे.


नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिडको चे शाखाधिकारी पवळे हे १९९० रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिवाजी नगर नांदेड येथे लिपीक या पदावर रुजू झाले त्यानंतर अर्धापूर, नाळेशवर, मुदखेड, बोधडी, सोनखेड व सिडको शाखा येथे सेवा बजावली आहे, सेवा काळात २०१८ मध्ये शाखाधिकारी म्हणुन पदोन्नती झाली. सध्या सिडको शाखेत शाखाधिकारी म्हणुन सहा वर्षे ऊत्कृष्ट सेवा बजावली, सभासद यांना एटीएम कार्ड, पंतप्रधान जिवन जयोत विमा, सुरक्षा ठेव रक्कम मध्ये वाढ, यासह सभासद यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला.


जवळपास ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. १ मे रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिडको येथे सेवानिवृत्ती निरोप सोहळा संचालक शिवाराम लुटे व मान्यवराचा उपस्थित सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन रोखपाल आर. के. देशमुख यांनी केले आहे.

