
नांदेड। युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक, शिक्षण ,साहित्य,राजकीय पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा निर्माण करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना डॉ.बी.आर. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मागील २१ वर्षा पासून हा स्तुत्य उपक्रम सुरु आहे. वर्ष २०२२-२३ च्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणा संस्थेचे अध्यक्ष बापूराव गजभारे यांनी हॉटेल अतिथी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत केली.


साहित्य,आरोग्य समाजसेवा या कार्यासाठी नांदेड येथील सर्वांना परिचित असलेल्या डॉ.वृषालीताई माधवराव किन्हाळकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर राज्यस्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांना दिला जाणार आहे पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रोख सन्मानपत्र असे आहे.


जिल्हा पुरस्कारासाठी हिंदी लोकमत समाचारचे प्रतिनिधी पन्नालाल शर्मा १० हजार रुपये रोख समानपत्र व प्रेस फोटोग्राफर हाफ़ीज पठाण मुखेड ( ग्रामीण) ५ हजार रुपये रोख सन्मानपत्र विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी जाहीर केलेला प्रज्ञावतं पुरस्कार दिवंगत मनोज नागोराव गजभारे यांच्या नावाने ‘ मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी ‘ प्रथम पुरस्कार लोहा तालुकयातील प्रतिकूल परिस्थीतीतुन शिक्षण घेत असलेला पीएचडी स्कॉलर विदयार्थी सिद्धांत दिलीप महाबळे यांना दिला जाणार आहे.पुरस्काराचे स्वरूप ५००० रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. संबंध राज्यात आंबेडकरी चळवळीत आणि पत्रकारितेत या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.


गेली २१ वर्ष सातत्याने सुरु असलेला हा उपक्रम चळ्वळीचाच एक भाग बनला आहे याचे समाधान आम्हां सर्वांना वाटते असे गजभारे यांनी पुरस्कारा विषयी भावना व्यक्त करतांना सांगितले. पत्रकार परिषेदेला संस्थेचे उपाध्यक्ष सतीश बनसोडे सचिव आकाश गजभारे, सहसचिव कुलदीप चिकटे,विनोद भरणे जिल्हाध्यक्ष पीआरपी सतीश पांडवे, ईश्वरप्रसाद अग्रवाल ,राजू पार्डीकर, राजेंद्र शुक्ला लक्ष्मण गोडबोले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
