
लोहा| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत. त्यांच्या सविधानावरच हा देश चालतो मलाही संसदेत जाण्याचे भाग्य मिळाले. बेरळी येथील बौद्ध विहार व इतर विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.


बेरळी (बु.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खा. चिखलीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसीलदार व्यंकटेश मुंडे, बेरळीचे भूमिपुत्र यवतमाळ येथील प्रशिक्षणार्थी उपमुख्यकार्य अधिकारी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेते करीम शेख,माजी पं.स.उपसभापती नरेंद्र गायकवाड, नगरसेवक भास्कर पवार, बालाजी खिल्लारे, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार, मारोतराव पाटील बोरगावकर, जयंती मंडळाचे अध्यक्ष देवानंद रायबोले, उपाध्यक्ष नामदेव बुद्धे, सरपंच व्यंकटेश नाईक, भारत कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


खा चिखलीकर म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्याच्या संविधानावर हा देश चालतो. सर्वोच्च सभागृहात जाण्याचा मान मला आपल्या मताधिकारामुळे मिळाला आणि हा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला. आज त्याचे विचार आत्मसात करावेत अंगिकरावे अरविद रायबोले यांच्या पुढाकाराने गावात अभ्यासिका सुरू झाली हळे खूप मोठे कार्य होत आहे. बेरळी येथील बुद्ध विहार तसेच विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असे खासदार प्रतापराव पाटील यांनी सांगितले.

