
नवीन नांदेड। सिडको परिसरातील अनेक भागात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जना सह मुसळधार पावसामुळे रोडवरील भाजीपाला, हातागडे , यासह नागरिकांची मोठया प्रमाणात धावपळ पहावयास मिळाली.


सिडको परिसरातील अनेक भागात २५ एप्रिल रोजी दुपारी तर २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ चा सुमारास आभाळातील गडगडाट व मेघगर्जना , अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रोडवरील भाजीपाला, किरकोळ विक्रेते यासह मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक यांच्यी धावपळ सुरू झाली, सुमारे वीस मिनिटे झालेल्या मुसळधार पावसामुळे रोडवरील दुतर्फा असलेल्या नाला पाण्याचा प्रवाहाने खळखळून वाहत होता, अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरीकांनी वाहने बाजुला लावून थांबले तर पायी जाणाऱ्या अनेकांनी आडोसा घेतला.


रोजच दुपार, सायंकाळी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरीकांनी मात्र सावधपणा घेतला आहे, रोजच होत असलेल्या पावसामुळे नागरीकांनी घरावरील पत्रे ऊडु नये यासाठी परिवारातील सदस्य ऊपाय योजना करण्यासाठी धावपळ करत आहेत तर पावसाळया पुर्वी होत असलेल्या पावसाची धास्ती व्यापारी सह, नागरीकांनी घेतली आहे.

