नवीन नांदेड। भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी देशात सर्वात मोठी जलक्रांती केली असल्याचे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी कै. शंकरवाजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ सिडको येथील पाणपोई उदघाटन प्रसंगी बोलत होते.
सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कै. शंकररावजी चव्हाण पाणपोईचे उदघाटन दि. २६ एप्रिल रोजी नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड मनपाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती डॉ.ललिता शिंदे बोकारे तर ,भी.ना.गायकवाड आहातखान पठाण, किशनराव रावणगावकर,विश्वनाथ शिंदे,शंकरराव धिरडीकर,यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी नरेंद्र चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की कै. डॉ.शंकररावजी चव्हाण यांनी देशात जवळपास ३२१७ लहान मोठी धरणे बांधली व देशातील व राज्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सफलाम झाला,शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात जलसिंचनाखाली आलं. आणि पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली, डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे अतुलनीय कार्य जनता पुढील शंभर वर्षे तरी कदापी विसरणार नाही असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीनिवास जाधव यांनी केले,तर अध्यक्षीय समारोप करताना डॉ. ललिता शिंदे बोकारे यांनी डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शशिकांत हटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजनाथ माने यांनी मानले.
यावेळी शेख मोईन लाटकर,मोहम्मद नुरोद्दीन, देविदास कदम,डॉ.सुभाष वाघमारे, काशिनाथ गरड,पंढरीनाथ रोडे, नामदेव पदमने, अक्षय मुपडे, अशोक वाडे, केरबा लांडगे, मेजर गुपिले, शंकर बसवंते, भगवान जोगदंड, ज्ञानेश्वर दूधबे, शंकर बसवंते, माणिकराव श्रोते, हिरामण लांडगे, राहुल गवारे, रामराव शिंदे, दापकेकर, बेग मामू, शमशाद बेगम, संतोषी भाले, अनिता गजेवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शशिकांत हटकर व वैजनाथ माने यांनी स्वखर्चातून करत एक सामाजिक दायित्व पार पाडले.