
नांदेड| नांदेड शहर व परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि आपल्या श्री गुरुजी रूग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे येत्या शुक्रवारी दि. २८/०४/२०२३ रोजी नवजात अर्भक दक्षता विभाग (NICU) सुरु होत आहे. यात योजना रुग्णास मोफत तर योजनेमध्ये न बसणाऱ्या गरजू व्यक्तीसाठी कमी खर्चाचे व किफायतशीर दरात श्री गुरुजी रुग्णालय छत्रपती चौक, नांदेड येथे (NICU) विभाग कार्यान्वित होणार आहे.


जन्मापासून ते ३७ आठवड्यापर्यंत च्या बालकांसाठी कुठल्याही प्रकारचा आजार व त्याची वैद्यकीय सेवा घेण्यासाठी या रुग्णालयात शासनातर्फे रुग्णास लागू सर्व योजना यशस्वीरित्या कार्यान्वित आहेत. उदा. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, यास्तव सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा, तज्ञ डॉक्टर्स व स्टाफ यांचे समवेत (NICU) विभाग दि. २८/०४/२०२३ पासून जनसेवेत रुजू होत आहे.


श्री गुरुजी रुग्णालय, डॉ एम जी बजाज इस्टेट, छत्रपती चौक, पूर्णा रोड, नांदेड येथे दि.२८/०४/२०२३ रोजी सायं- ७ वाजता या NICU चा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. नांदेड च्या आरोग्य सेवेत चिरंतन योगदान देण्यासाठी सज्ज झालेल्या श्री गुरुजी रुग्णालय येथे नवजात अर्भक दक्षता विभाग (NICU) या समर्पित वैद्यकीय उपक्रमाच्या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स व हितचिंतकानी उपस्थित रहावे आणि NICU विभाग व सुविधा यांची प्रत्यक्ष खातरजमा करून उपक्रमास जनहितार्थ प्रतिसाद व सहकार्य करावे असे आवाहन श्री गुरुजी रुग्णालय व्यवस्थापणाने केले आहे.

